Latest

सांगली लोकसभेवर विश्वजीत कदमांची भूमिका जाहीर; पदाधिकाऱ्यांना नाराजी पत्र लिहून म्हणाले…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सांगलीच्या राजकारणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र सध्या सांगलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंबंधी त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना लिहीलेले एक पत्र सध्या समोर आले आहे.

विश्वजीत कदम यांनी आज एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सांगली लोकसभेसाठी तिकीट मिळावं हा त्यांचा अट्टाहास आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मात्र महाविकासआघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर केल्यानंतर या जागेचा तिढा वाढल्याचे दिसून आले. आज त्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आता सांगलीच्या राजकीय वर्तुलात चर्चा रंगलेल्या आहेत.

यापूर्वी दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली असली तरी या जागेवरील दावा सोडण्यास काँग्रेस तयार नसल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्यासह पक्षाचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी थेट दिल्ली गाठत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी देखील घेतल्या आहेत. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने ही जागा सोडू नये, अशी या नेत्यांची आग्रही मागणी आहे. विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि मुकूल वासनिक यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विश्वजीत कदम यांनी आक्रमक शब्दांत आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT