Latest

Virat Kohli’s Restaurant : किशोर कुमारांच्‍या मुंबईतील बंगल्‍यात विराट कोहली सुरु करणार रेस्‍टॉरंट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज विराट कोहली हा मुंबईत नवीन रेस्‍टॉरंट सुरु करण्‍याच्‍या तयारीत आहे. यासाठी त्‍याने दिवंगत गायक किशोर कुमार यांचा मुंबईतील जुहू येथील बंगला भाडेतत्‍वावर घेतला आहे. येथे तो एक भव्‍य रेस्‍टॉरंट सुरु करणार आहे. याचे कामही पूर्ण झाले आहे. ( Virat Kohli's Restaurant ) पुढील महिन्‍यात हे रेस्‍टॉरंट सुरु होईल, असे मानले जात आहे. याबाबतचे वृत्त 'ई-टाइम्‍स'ने दिले आहे.

किशोर कुमार यांच्‍या कुटुंबीयांबरोबर 'डील' फायनल

यासंदर्भात किशोर कुमार यांचा मोठा मुलगा व प्रसिद्ध गायक अमित कुमार यांनी सांगितले की, काही महिन्‍यांपूर्वी सुमित ( किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमित कुमार ) याने विराट कोहलीची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्‍ये मुंबईतील जुहू येथील बंगला भाड्याने घेण्‍याबाबत चर्चा झाली. अखेर ५ वर्षांसाठी हा बंगला विराटने भाडे तत्‍वावर घेतला आहे.

किशोर कुमारांचा जुहू तारा रोड येथे गौर कुंज हा बंगला आहे. किशोर कुमार हे मुंबईत असताना याच बंगल्‍यात राहत होते. या बंगल्‍याजवळील हिरवाईचे त्‍यांना खूप आकर्षण होते. विशेष म्‍हणजे, किशोर कुमार यांनी बंगल्‍यातील झाडांना विशिष्‍ट अशी नावे दिली होती. बंगल्‍यात एक गॅरेजही होते. येथे ते आपली आवडती कार पार्क करत असत. १३ ऑक्‍टोबर १९८७ रोजी किशोर कुमार यांचे निधन झाले. त्‍यांनी आपल्‍या कारकीर्दीत तब्‍बल ११० संगीतकारांबरोबर २ हजार ६७८ चित्रपटातील गीतांना स्‍वर दिला होता. तसेच त्‍यांनी ८८ हून अधिक चित्रपटांमध्‍येही भूमिकाही साकारल्‍या होत्‍या.

Virat Kohli's Restaurant : गौर कुंज बंगला पुन्‍हा प्रकाशझोतात

२०१८ मध्‍ये गौर कुंज हा बंगला एका रेस्‍टॉरंटसाठी भाड्याने देण्‍यात आला होता; पंरतू मुंबई महापालिकेने बंगल्‍याच्‍या तळघरात झालेला बांधकाम अवैध असल्याचे स्पष्ट करत सुमित कुमार यांना नोटीस बजावली होती. आता विराट कोहली येथे रेस्‍टॉरंट सुरु करणार असल्‍याने पुन्‍हा एकदा हा बंगला प्रकाशझोतात आला आहे.

विराट कोहली ९०० कोटींपेक्षा अधिक संपतीचा मालक

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्‍या यादीत विराट हा ६१ व्‍या क्रमांकावर आहे. सध्‍या तो ३० हून अधिक ख्यातनाम ब्रँडसाठी जाहीरात करतो. ब्रँडच्‍या जाहीराती, आयपीएल व आंतरराष्‍ट्रीय सामने यातून त्‍याची वार्षिक मिळकत २०० कोटी रुपयांहून अधिक आहे. तर त्‍यांची एकुण संपत्तीही ९०० कोटी रुपयांहून अधिक आहे. यापूर्वीही त्‍याने अनेक व्‍यवसायांमध्‍ये गुंतवणूक केली आहे. UAE Royals या टेनिस टीम, Wrogn ब्रँड, इंडियन सूपर लीगमधील FC Goa या संघाचा तो सह-संस्‍थापक आहे. तसेच One8 Commune बाररेस्टोचाही तो मालक आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT