Latest

Virat Kohli : ‘ती’ किस करताना पाहून अनुष्काला काय वाटलं असेल?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कोहलीला एका महिला फॅन किस करताना दिसतेय. पण, लक्षपूर्वक पाहिलं तर सत्य वेगळचं आहे. विराटचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती महिला फॅन कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याला KISS करताना दिसतेय. (Virat Kohli)

खरंतर, विराटचा हा मेणाचा पुतळा दिल्ली येथील मादाम तुसाद म्युझियम (Madame Tussauds) मध्ये ठेवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, महिला फॅन विराटच्या पुतळ्याजवळ जाताचं ती स्वत:ला रोखू शकत नाही. ती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या पुतळ्याला किस करताना दिसतेय. हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक कमेंट करत आहेत. अनेक लोकांनी व्हिडिओवर कमेंट करत अनुष्काला टॅग केलं आहे. तर काहींनी व्हिडिओ पाहून म्हटलं आहे की, कुणीतरी अनुष्का शर्माला बोलवा.

सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल होताच एका युजरने लिहिलं, "अनुष्का भाभीला बोलवा." एका अन्य युजरने टॅग करत लिहिलं की, "अनुष्का भाभी हे पहा, अखेर काय होत आहे." एका तरुणीने लिहिलं, "हे पाहायच्या आधी मी मेले का नाही."

एका अन्य युजरने लिहिलं, "विराट कोहलीच्या स्टॅच्यूसोबत असं करून काय मिळालं. उलट लोकांनी खरं-खोटं ऐकवलं."

कोहली आणि त्या मिस्ट्री गर्लचा व्हिडिओ ट्विटरवर @GemsOfSimps नावाच्या हँडलने शेअर केला आहे. काहीचं सेकंदात या क्लिपने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. हा व्हिडिओ आतापर्यंत ८८ हजारांहून अधिकवेळा पाहण्यात आलाय.

लोकांचे एकापेक्षा एक कमेंट्स

व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर कोहलीच्या एका फॅनने अनुष्काला प्रश्न विचारला की, 'हे काय होत आहे.' दुसऱ्या युजरने कमेंट केलंय की, 'हे जर पुरुषाने केलं असतं तर ?' दुसऱ्या युजरने लिहिलंय-'विराटच्या स्टॅच्यूसी हिचं लग्न लावा. वेडी कुठली.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT