Latest

Virat Kohli vs Shakib : पंचाकडे ‘नो बॉल’ची मागणी; अन् विराट-शाकिबमध्ये मैदानावर जुंपली (Video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या, मात्र पावसामुळे त्यांना 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. पण 16 षटकांत सहा विकेट्सवर ते केवळ 145 धावाच करू शकले. (Virat Kohli vs Shakib)

सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं?

दरम्यान या सामन्यात विराट कोहली आणि शाकिब अल् हसन यांच्यामध्ये 'नो बॉल'वरून वाद पहायला मिळाला. बांग्लादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम भारताने २० षटकामध्ये ६ विकेट्स गमावत १८४ धावा केल्या. विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने बांग्लादेशला १८५ धावांचे आव्हान दिले होते. (Virat Kohli vs Shakib)

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आजच्या सामन्यातही त्याने जोरदार फटकेबाजी केली. दरम्यान विराट फलंदाजी करत असताना १६ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बांग्लादेशच्या गोलंदाजाने बाऊंसर टाकला. विराटने हा चेंडू फटकावला आणि क्षणाचाही विलंब न लावता पंचांकडे 'नो बॉल'ची मागणी केली आणि पंचांकडूनही 'नो बॉल'चा इशारा देण्यात आला.

कोहलीला नो बॉलची मागणी करताना पाहताच बांग्लादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन पंचांकडे धावू लागला. याक्षणी विराट शाकिबच्या समोर आला. यानंतर विराट आणि शाकिबमध्ये वाद पहायला मिळाला. मात्र, दोघांनीही शेवटी हसत हसत हा वाद मिटवला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. आयसीसीकडूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही विराट कोहलीने चेंडूवर फटका लगावताच विराटने 'नो बॉल'ची मागणी केली होती. मात्र, या सामन्यात शाकिबने कोहलीच्या प्रतिक्रियेचे हसत हसत स्वागत केले आणि वाद थांबवला. (Virat Kohli vs Shakib)

विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम! (Virat Kohli vs Shakib)

या सामन्यात विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. तो टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये 16 धावा करताच कोहलीने हा पराक्रम केला. याचबरोबर विराटने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. विराटच्या आधी हा विक्रम जयवर्धनेच्या नावावर होता. त्याने टी 20 विश्वचषकाच्या इतिहासातील 31 सामन्यांमध्ये 39.07 च्या सरासरीने आणि 134.74 च्या स्ट्राइक रेटने 1016 धावा केल्या होत्या. (Virat Kohli vs Shakib)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT