Latest

Virat Kohli Statement : रोहित शर्मा, रवींद्र जडेजाच्या माघारीवर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli Statement) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये कोहलीनेही वनडे कर्णधारपदावर आपले मत मांडले, जो गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा सर्वात मोठा विषय बनला होता.

कोहली म्हणाला की, 'बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर करण्यापूर्वी एक तास आधी मला कॉल केला. संघ निवडीवरून चर्चा झाली. तसेच पुढे त्यांनी मला या पुढे मी एकदिवसीय संघाचा कर्णधार राहणार नाही असे सांगितले. एकदिवसीय कर्णधार बदलाची माहिती मला दीड तास आधी देण्यात आली होती. त्याआधी मला काहीच सांगितले गेले नाही. मुख्य निवडकर्ते माझ्याशी बोलले आणि म्हणाले की आम्ही एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलणार आहोत. तू या पुढे कर्णधार राहणार नाहीस. मंडळाच्या या निर्णयावर मी तत्काळ 'ठीक आहे' असा प्रतिक्रिया दिली', असं त्याने सांगितले. (Virat Kohli Statement)

याचबरोबर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा या टीम इंडियाच्या दोन प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीवर विराटने प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतींमुळे कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. रोहित शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे तर जडेजाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. (Virat Kohli Statement)

दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीवर कर्णधार कोहलीने मौन सोडले आणि तो म्हणाला की, 'संघाला कसोटीत रोहित शर्माची उणीव भासेल कारण त्याने इंग्लंडमध्ये खूप चांगल्या लयीत धावा केल्या. दुसरीकडे, केएल राहुल आणि मयंक यांना संधीचा फायदा उठवण्याची उत्तम संधी आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा हा आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो सर्व क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये महत्त्वाचे योगदान देतो. तो लवकर बरा व्हावा अशा जडेजाला माझ्याकडून शुभेच्छा.' (Virat Kohli Statement)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहली वनडे मालिकेतून ब्रेक घेणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अशी बातमी आली होती की, विराट कोहलीला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करायचा आहे आणि त्यासाठी त्याने सुट्टी घेतली आहे. मात्र, पत्रकार परिषदेत कोहलीने हे वृत्त फेटाळून लावले. तो म्हणाला की, मी द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे आणि त्याने अशी कोणतीही विनंती बीसीसीआयला केली नसल्याचे स्पष्ट केले. (Virat Kohli Statement)

टीम इंडिया 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT