पुढारी ऑनलाईन : मुंबईत झालेल्या भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यात भारताने किवींचा ३७२ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. कानपुरमध्ये खेळला गेलेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता. जयंत यादव आणि आर अश्विन यांनी भारताला वानखेडेवरील कसोटी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोन्ही गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात ४-४ विकेट घेतल्या. मुंबई कसोटी जिंकल्यानंतर भारताने तीन दशकांहून अधिक काळ घरच्या मैदानावर किवींविरुद्ध मालिका जिंकण्याचा विक्रम कायम ठेवला. या कसोटी सामन्यादरम्यान एक मजेदार घटना घडली. क्रिकेट चाहत्यांच्या मागणीनुसार कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Dance) मैदानात नाचू लागला. विराटच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Captain : रोहित शर्मा होणार ODI चा कॅप्टन, द. आफ्रिका दौ-यासाठी BCCI संघाची घोषणा करणार
कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंड दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना कर्णधार विराट कोहली डान्स करताना दिसला (Virat Kohli Dance). कोहलीने हा डान्स चाहत्यांच्या विनंतीवरून केला. विराट कोहलीने अनिल कपूर आणि जॅकी श्रॉप यांच्या राम लखन या चित्रपटातील वन टू का फोर, फोर टू का वन या गाण्यावर डान्स केला. अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली अशा प्रकारचा डान्स करताना दिसला आहे.
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी आणि टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. मात्र भारताची खरी कसोटी आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात असेल. टीम इंडियाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यात अपयश आलेले आहे. टीम इंडिया याच महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. जिथे 26 डिसेंबरपासून दोन्ही देशांदरम्यान बॉक्सिंग डे कसोटी खेळली जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.