Latest

Virat Kohli New Record : विराट कोहलीचा धमाका! धोनी-द्रविडचा ‘हा’ विक्रम मोडला

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli New Record : टीम इंडियाचा रन मशिन विराट कोहलीने धमाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत शानदार अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे 66 वे अर्धशतक ठरले. याचबरोबर कोहलीने मोठा इतिहास रचला. त्याने 2023 मध्ये एक हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करत माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांचे विक्रम मोडीत काढले.

खरं तर, एका वर्षात सर्वाधिक वेळा 1000 धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 12 वेळा ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर धोनी आणि द्रविडने 11 वेळा हा पराक्रम केला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने हा पराक्रम 16 वेळा केला आहे. सध्याचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा (9), माजी कर्णधार सौरव गांगुली (9) आणि माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (9) संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

विराट तिस-या स्थानी

एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणा-या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली तिस-या स्थानी पोहचला आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक 971 धावा केल्या आहेत. तर सध्याचा कर्णधार रोहित शर्मा 886 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता विराट कोहली एमएस धोनीला मागे टाकत या स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. एमएस धोनीने 19 सामन्यांच्या 16 डावात 648 धावा केल्या होत्या. या यादीत गौतम गंभीर पाचव्या क्रमांकावर आहे.

एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा (भारतीय खेळाडू)

सचिन तेंडुलकर- 971 धावा (23 सामने)
रोहित शर्मा- 886 धावा (25 सामने)
विराट कोहली- 656 धावा, (14 वा सामने)
एमएस धोनी- 648 धावा (19 सामने)
गौतम गंभीर- 573 धावा (13 सामने)

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आशिया कपच्या इतिहासात 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. टी-20 आशिया कपमध्ये त्याच्या नावावर 10 सामन्यांच्या 9 डावात 429 धावा आहेत. तो टी-20 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. म्हणजेच आशिया कपमधील एकूण धावांच्या बाबतीत विराट सचिनच्या पुढे आहे. कारण सचिनने एकही टी-20 आशिया कप खेळलेला नाही. तर विराटने 2016 आणि 2022 च्या टी-20 आशिया कपमध्ये भाग घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT