Latest

Virat Kohli : आयपीएलच्या दरबारात कोहलीची ‘विराट’ कामगिरी; बनला सात हजारी मनसबदार

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५० वा सामना आज (दि. ६ मे) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळवण्यात येत आहे. सामन्यात बेंगलोरचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि फाफने आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. आक्रमक फलंदाजी करताना विराट कोहलीने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. (Virat Kohli)

विराटने रचला इतिहास

सामन्यात दिल्लीकडून अक्षर पटेलने दुसरे षटक टाकले. या षटकातील पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने धाव घेताच आयपीएलच्या इतिहासात ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी कोहलीने आयपीएलमध्ये २३२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २२४ डावांमध्ये १२९.५८ च्या स्ट्राईक रेटने ६,९८८ धावा केल्या होत्या. तसेच कोहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ५ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत. (Virat Kohli)

विराट कोहलीने यंदाच्या हंगामात ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९ डावात ४५.५० च्या सरासरीने आणि १३७.८८ च्या स्ट्राईक रेटने ३६४ धावा केल्या. या खेळीमुळे तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कायम आहे. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे, ज्याने २१२ डावात ६५३६ धावा केल्या आहेत. तर, डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आणि सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली: ७०००* धावा
शिखर धवन : ६५३६ धावा
डेव्हिड वॉर्नर : ६१८९ धावा
रोहित शर्मा : ६०६३ धावा
सुरेश रैना : ५५२८ धावा

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT