Latest

BJP Vinod Tawade : विनोद तावडेंना मिळणार दोन राज्यांचे प्रभारीपद

backup backup

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (BJP Vinod Tawade) त्यांना हरियाणा पाठोपाठ आणखी दोन राज्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री, माजी राष्ट्रीय सरचिटणीस भुपेंद्र यादव यांच्याकडे असलेली बिहार, झारखंड राज्यप्रभारी पदाची जबाबदारी तावडे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, बुधवारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची माहिती दिली. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवून पुर्णपणे राष्ट्रीय राजकारणात संधी उपलब्ध करवून दिल्याची भावना तावडे यांनी व्यक्त केली.

सरचिटणीस पदाची जबाबदारी आल्याने स्वाभाविक राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय राहणार असून महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्षाकडून असलेली अपेक्षा पुर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

८ राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्र सरकार मधील काही प्रमुख नेते मिळून पक्ष कार्य करणार असल्याचे मे म्हणाले. महाराष्ट्रातून जेव्हाही योगदान मागितले जाईल तेव्हा १००% ते पुर्ण करू, असे तावडे म्हणाले. (BJP Vinod Tawade)

शेती सुधारणा कायदे मागे घेतल्यानंतर सुद्धा आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकरी नेत्यांचा निर्धार म्हणजे केवळ आंदोलनासाठी आंदोलन करायची मानकिसकता दाखवणारी असल्याचे सर्वसामान्यांना दिसून आले आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे कायदे मागे घेण्यात आलयाचे वरकर्णी वाटू शकते. पंरतु, बऱ्याच गोष्टींची शक्यता लक्षात घेता देशहितासाठी हे कायदे मागे घेण्यात आल्याचे तावडे म्हणाले.

'बाहुबलींना' ताकद द्यावी लागते!

पक्ष विस्तारासाठी बाहेरून आलेल्या ताकदवर नेत्यांना नक्कीच संधी दिली जाते. पंरतु, २०१९ च्या निवडणुकांमध्ये काही मोजक्याच बाहेरून आलेल्या लोकांना पक्षाने तिकिट दिले, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे यांच्या संबंधी प्रश्न विचारला असता, पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची अपेक्षा आहे असे वाटत नाही. महाराष्ट्रभर फिरून त्या सभा घेत आहेत, जनतेमध्ये जात आहेत. योग्य संधी पक्षाकडून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महत्वाच्या खात्याचे मंत्री असून देखील एखाद्या अधिकार्याच्या मागे का लागले आहेत? असा सवाल त्यांनी नबाब मलिक आणि समीर वानखेडे प्रकरणी उपस्थित केला.

तिन्ही पक्ष भविष्यात आघाडीत राहणार नाहीत

सत्तेसाठी तीन पक्षांनी एकत्रित येणे हे कृत्रिम होते, अशी भावना तावडे यांनी महाविकास आघाडी बद्दल व्यक्त केली.पंरतु, पक्ष टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाषा बोलण्याचा अर्थ म्हणजे येत्या विधानसभा निवडणूका या पक्षांकडून एकत्रित लढवल्या जाणार नाही. पुढे अशाप्रकारे आघाडी राहू शकत नाही, हे स्पष्ट होत असल्याचे तावडे म्हणाले.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT