पुढारी ऑनलाइन डेस्क : कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya) याने भारतातून पळून जाण्यापूर्वी विदेशात कोट्यवधी रुपयांची वैयक्तिक मालमत्ता खरेदी केली, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआयने ) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
देशातील १७ बँकांचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या विजय मल्ल्या (Vijay Mallya) याच्यावर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ५ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने मल्ल्याला 'फरार' घोषित केले होते. मल्ल्या २०१६ मध्ये भारत सोडून गेला. सध्या त्याचे वास्तव्य ब्रिटनमध्ये आहे.
सीबीआयने न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर विविध देशांना पत्र पाठवून मल्ल्याच्या (Vijay Mallya) व्यवहाराचा तपशील मागवला. यामध्ये मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने २०१५-१६ या कालावधीत इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ३३० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. त्याचवेळी त्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला रोकड टंचाईचा सामना करावा लागत होता. ही तीच वेळ होती जेव्हा रोकड टंचाईचे कारण देत मल्ल्याने थकीत कर्जाची परतफेड केली नव्हती, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
(Vijay Mallya) 'सीबीआय'ने आरोपपत्रात म्हटले आहे की, मल्ल्याकडे २००८ ते २०१७ दरम्यान बँकांची परतफेड करण्यासाठी पुरेसा पैसा होता. त्याने त्याच्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (KAL) साठी कर्ज घेतले होते. त्याने संपूर्ण युरोपमध्ये "वैयक्तिक मालमत्ता" खरेदी केली आणि स्वित्झर्लंडमधील त्यांच्या मुलांच्या ट्रस्टमध्ये पैसे हस्तांतरित केले होते. मल्ल्याने फ्रान्समध्ये 35 दशलक्ष युरोमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती.
(Vijay Mallya) मल्ल्या 900 कोटी रुपयांहून अधिक आयडीबीआय बँक-किंगफिशर एअरलाइन्स कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी आहे. ज्याची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी यापूर्वी सीबीआयने आरोपपत्रात ११ आरोपींची नावे दिली आहेत. आयडीबीआय बँकेचे माजी महाव्यवस्थापक बुद्धदेव दासगुप्ता यांचेही यामध्ये समावेश आहे. दासगुप्ता यांनी कशाप्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विजय मल्ल्या याला १५० कोटींचे कर्ज मंजूर केले याची तपशीलवार माहितीही आरोपपत्रात आहे.
हेही वाचा :