Latest

Video Viral : ‘फोटोग्राफरचा डान्स लाजवाब’; व्हिडिओ व्हायरल 

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि त्याचा ट्रेंड बनेल हे सांगता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका विवाहसोहळ्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शूट करणाचे कंत्राट दिलेल्या व्यावसायिक फोटोग्राफरचा  आहे. हा फोटोग्राफर एका लग्नसोहळ्याचे व्हिडिओ शूट करत असताना शूट सोडून स्वतःच नाचू लागला. हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Video Viral)

Video Viral : व्हिडिओ व्हायरल

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विवाहानंतर फोटोग्राफर डान्स परफॉर्मेंस शूट करत होता. डान्स करणाऱ्या लोकांचे चित्रण करता-करता तोही डान्स करु लागला आहे. "आडियां ढोह के पैइयां झांझारा. लौंग मारे लश्कारे कंगना तेरा नी सानु करे इशारे." या पंजाबी गाण्यावर लोक डान्स करत होते. आता त्याचा स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी त्याची प्रशंसा केली आहे.

हा व्हिडिओ@PunjabiTouch या युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जवळपास  2 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच  कमेंट सेक्शनमध्ये या फोटोग्राफरची प्रशंसा केली जात आहे. एकाने कमेंट केली आहे की," फोटोग्राफरचा डान्स लाजवाब आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT