Latest

Video : हवेतच विमानाच्‍या इंजिनने घेतला पेट…. १८५ प्रवाशांनी अनुभवला जीवघेणा थरार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
हवेतच विमानाच्‍या इंजिनाने पेट घेतला आणि पाटणाहून दिल्‍लीला जाणार्‍या स्‍पाइसजेटमधील १८५ प्रवाशांनी आज जीवघेणा थरार अनुभवला. विमाना पक्षी धडकल्‍याने इंजिना धडकल्‍याने ही आग लागल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. दरम्‍यान, विमानानेउड्‍डाण घेताच ही दुर्घटना घडली मात्र पाटणा विमानतळावर पुन्‍हा सुरक्षित लँडिंग करण्‍यात आल्‍याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. या विमानाच्‍या इंजिनमधून स्‍पार्क होत असल्‍याचा व्‍हिडीओ आता व्‍हायरल झाला आहे. विमान हवेत असतानाच लँडिंगपूर्वीच त्‍याच्‍या इंजिनमधून धूर येत असल्‍याचे यामध्‍ये स्‍पष्‍ट होत आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथून स्‍पाइसजेटच्‍या विमानाने उड्‍डाण केले. मात्र विमानाने उड्‍डाण घेताच इंजिनला आग लागल्‍याचे व त्‍यामधून धूर येत असल्‍याचे दिसले. यावेळी वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत पुन्‍हा एकदा विमान पाटणा विमानतळावरच उतरवले. पाटणा विमानतळावरी वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. वैमानिकांच्‍या अचुकतेमुळे तब्‍बल १८५ प्रवाशांचे प्राण वाचले. यामध्‍ये दोन बालकांचाही समावेश होता. सर्व प्रवासी सुखरुप आहेत, अशी माहिती पाटणाचे जिल्‍हाधिकार्‍याी चंद्रशेखर सिंग यांनी दिली आहे. पाटणा विमानतळाचे संचालकांनीही सर्व प्रवासी सुखरुप असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

SCROLL FOR NEXT