Latest

Cristiano Ronaldo : रोनाल्डो आणि रिअल मद्रिद खेळाडूंच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्रिस्तियानो रोनाल्डो २००९ मध्ये रिअल माद्रिदशी कारार केला. यानंतर सलग ९ वर्ष तो क्लबशी करारबद्‍ध होता.  रोनाल्डोच्या उपस्थितीत हा क्लब 2016 ते 2018 दरम्यान सलग तीन वेळा चॅम्पियन्स लीगचा विजेता ठरला. (Cristiano Ronaldo) रोनाल्डो पुन्हा एकदा आपल्या जुन्या क्लब रियल माद्रिदच्या खेळाडूंसोबत दिसला. रिअल माद्रिदने क्लबचे खेळाडू आणि रोनाल्डोच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रोनाल्डो क्लबच्या खेळाडूंसोबत गप्पा मारताना दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद मिळत आहे. (Cristiano Ronaldo)

फिफा विश्वचषकादरम्यान रोनाल्डोचा कोणत्याही क्लबसोबत करार नव्हता. मात्र, या स्पर्धेनंतर तो सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबमध्ये सामील झाला होता. त्‍यानंतर  तो पुन्हा एकदा आधीचा क्लब रिअल माद्रिदच्या खेळाडूंसोबत दिसल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

सोमवारी मध्य रात्री रिअल माद्रिदचा सामना पारंपारिक विरोधी संघ बार्सिलोनाविरुद्ध होणार आहे. सुपर कोपा स्पर्धेतील हा सामना सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे होणार आहे. या सामन्यासाठी बार्सिलोना आणि रियल माद्रिदचे संघ सौदी अरेबियामध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, रोनाल्डो त्याच्या जुन्या क्लबच्या सदस्यांना भेटण्यासाठी पोहोचला होता.

रिअल माद्रिदने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये मद्रिदचे प्रशिक्षक अँसेलोटी आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना रोनाल्डो भेटताना दिसत आहे. यासोबत रोनाल्डोने ब्राझीलचे खेळाडू विनिशियस ज्युनियर आणि रॉड्रिगो यांच्याशी जिम आणि ड्रेसिंग रूममध्ये गप्पा मारल्या.

ख्रिस्तियानो २००९ ते २०१८ पर्यत रिअल माद्रिद क्लबकडून खेळत होता. त्याने या क्लबसोबत चारवेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे. रोनाल्डोच्या उपस्थितीत हा क्लब २०१६ ते २०१८ दरम्यान सलग तीनवेळा चॅम्पियन्स लीगचा विजेता ठरला. रोनाल्डोने मद्रिदसाठी ३११ सामन्यांत २९२ गोल केले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT