Latest

Victims of superstition : धक्कादायक! अंधश्रद्धेने घेतला 3 महिन्यांच्या चिमुकलीचा बळी, न्यूमोनिया बरा करण्यासाठी 51 वेळा दिले लोखंडी सळईने चटके

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : मध्यप्रेदशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळे Victims of superstition एका 3 महिन्यांच्या चिमुकलीचा बळी गेला आहे. न्यूमोनिया बरा करण्यासाठी झांडफूक करून या चिमुकलीला 51 वेळा गरम लोखंडी सळईने दागण्यात (चटके) आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शहडोल या आदिवासी बहुल जिल्ह्यात सिंगपूर कथोटिया येथे एका तीन महिन्यांच्या मुलीला न्यूमोनियामुळे श्वास घेण्याचा त्रास होत होता. या मुलीच्या माता पित्यांनी तिला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी तेथील दाग देण्याच्या प्रचलित कुप्रथेवर विश्वास ठेवला Victims of superstition आणि आपल्या मुलीला एका झांडफूक करणा-याकडे नेले. तिथे या मुलीला झांडफूक करणा-याने गरम लोखंडी सळईने 51 वेळा दाग दिले (चटके दिले). परिणामी मुलीची प्रकृती ढासळली. अशा स्थितीत कुटुंबीयांनी त्यांना शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये नेले. महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात गेले असता ही घटना 15 दिवस जुनी असल्याचे दिसून आले. मात्र, या घटनेमुळे न्यूमोनियाचा संसर्ग वाढल्याने या निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाला. Victims of superstition

Victims of superstition : आदिवासी भागात लोखंडी सळईने दागण्याची जुनी 'कुप्रथा'

मध्यप्रदेशात अनेक आदिवासी बहुल भागात लोखंडी सळईने लहान मुलांना दागण्याची (लोखंडी सळई गरम करून त्याने चटके देणे) फार जुनी कुप्रथा आहे. सरकार आणि प्रशासनाकडून वेळोवेळी या कुप्रेथेचे निर्मुलन करण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जातात. मात्र, त्याचा फारसा काही उपोयग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

नुकत्याच घडलेल्या या चिमुकली बाबतही असेच घडले. शहाडोलच्या जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीच्या आईला एका अंगणवाडी सेविकेने मुलीच्या आईला दोनदा मुलीला न दागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीही मुलीच्या कुटुंबीयांनी तिला झांडफूक करणा-याकडे नेले. तिथे तिला एक दोनदा नव्हे तर तब्बल 51 वेळा दाग देण्यात आले. Victims of superstition त्यानंतर मुलीची प्रकृती आणखी ढासळल्याने कुटुंबीयांनी तिला शहडोलच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेले. मात्र श्वासाची तार तुटल्याने मुलीला वाचवता आले नाही. मुलीला महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात नेले असता मुलीला गरम लोखंडी सळईने दागण्याची घटना 15 दिवस जुनी असल्याचे आढळले. असे त्यांनी म्हटले आहे.

याविषयी फिजिशियन आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया म्हणाले, अशा प्रकारे दाग दिल्याने मृत्यू होऊ शकतो. वेदना लपवण्याचा हा एक मार्ग आहे. Victims of superstition त्याची सर्वात मोठी समस्या ही आहे की संसर्ग अतिप्रमाणात होऊ शकतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे घातक ठरू शकते.

Victims of superstition : गुन्हा दाखल करावा

डॉ. हितेश वाजपेयी (वैद्यक आणि प्रवक्ते भाजप) म्हणाले, 'न्यूमोनिया तर कमी होत नाही, परंतु दुय्यम संसर्ग होण्याची शक्यता खूप असते. आदिवासीबहुल भागात झांडफूंक आणि दाग देण्याची वाईट प्रथा आहे. जिथे एखादी घटना घडली असेल तिथे गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती मी सीएमएचओला करू इच्छितो.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT