Latest

“काही लोक विदेशात जाऊन…” : उपराष्‍ट्रपतींचा राहुल गांधींना टोला

नंदू लटके

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : देश आज 'अभूतपूर्व प्रगती' करत आहे आणि 'गुंतवणुकीसाठी आणि संधींसाठी जागतिक गंतव्यस्थान' म्हणून उदयास येत आहे. अशा वेळी घातक, अशुभ आणि देशद्रोही चारित्र्याचे लोक वेळोवेळी परदेशात देशविरोधी कथा पसरवत असतात, अशा शब्‍दांमध्‍ये उपराष्‍ट्रपती जगदीप धनकड ( Vice President Jagdeep Dhankhar ) यांनी अप्रत्‍यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली. नवी दिल्‍लीत इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेयर्सच्या नूतनीकरण केलेल्या लायब्ररीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

संबंधित बातम्‍या

Vice President : भारताचा विकास पाहून काही लोक अस्वस्थ

या वेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड म्‍हणाले की, भारताचा विकास पाहून काही लोक अस्वस्थ होतात. तुम्ही ब्रिटनला जाऊ शकता, मात्र देशविरोधात घातक, भयंकर आणि देशद्रोही चारित्र्याचे प्रवचन वेळोवेळी केले जाते. घटनात्मक संस्थांना कलंकित, बदनामी, अधोगती आणि उद्ध्वस्त करण्याच्या अशा डावपेचांना तटस्थ करण्यात तुमची (संशोधन प्राध्यापकांची) भूमिका पुरेशी आहे, असाही टोला त्‍यांनी लगावला.

युरोप दौर्‍यावर असताना राहुल गांधीही केली होती केंद्रावर टीका

ब्रिटन आणि अमेरिकेच्या मागील दौऱ्यांदरम्यान केंद्रावर निशाणा साधणाऱ्या राहुल यांनी सध्याच्या युरोप दौऱ्यात ब्रुसेल्समध्ये बोलताना राहुल गांधी केंद्र सरकारव टीका केलीहोती. भारतात 'लोकशाही संस्थांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला' केला जात आहे, असा आरोप त्‍यांनी केला होता. 'एक राष्ट्र, एक निवडणूक ही संकल्पना आहे. कुणाला याच्याशी असहमत तर कुणी मनापासून विरोध करू शकतो. पण आम्ही चर्चा करणार नाही असे म्हणणे म्हणजे लोकशाही नाही, असेही ते म्‍हणाले होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT