Latest

Ramdas Kamat : ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांचे निधन

backup backup

मुबंई ; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ गायक अभिनेते माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष पंडित रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रामदास कामत यांची उत्तम गायक आणि नाटकाच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार म्हणून ओळख होती. काल दि.०८ रात्री ९.४५ मिनीटांच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. (Ramdas Kamat)

विलेपार्ले येथील निवासस्थानी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉक्टर कौस्तुभ कामत, सून डॉ संध्या कामत आणि नातू अनिकेत व नातसून भव्व्या असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी पारसीवाडा स्मशान भुमी अंधेरी पुर्व येथे होणार आहे.

Ramdas Kamat : पंडित रामदास कामत हे मूळचे गोव्याचे

मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत हे मूळचे गोव्याचे आहेत. लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले.

पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते.

तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या 'संगीत संशय कल्लोळ' या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'संगीत मानापमान', 'संगीत मदनाची मंजिरी', 'संगीत एकच प्याला', 'संगीत मंदारमाला', 'संगीत होनाजी बाळा' अशा जवळपास अठरा संगीत नाटकांमधून काम केले होते.

SCROLL FOR NEXT