Latest

Daljeet Kaur : पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे निधन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर ( Daljeet Kaur ) यांचे काल दीर्घ आजाराने लुधियाना येथे निधन झाले. यावेळी त्या ६९ वर्षांच्या होत्या. दलजीत कौर त्याच्या निधनाने चाहत्यासह कलाकारंमध्ये शोककळा पसरली आहे. दलजीत कौर यांना पंजाबी चित्रपट सृष्टीतील 'हेमा मालिनी' म्हणून ओळखले जात होते.

दलजीत कौर यांचे चुलत भाऊ हरिंदर सिंग खंगुरा यांनी याबबातची माहिती दिली आहे. यात त्यांनी दलजीत या गेल्या तीन वर्षांपासून ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या कोमात होत्या. याच दरम्यान सकाळी पहाटेच्या सुमारास त्याचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच पंजाबी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेत्री निरू बाजवाने हिने दलजीत कौर यांना श्रद्धांजली वाहताना इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबतचा एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, 'दलजीत कौर जी तुम्ही माझ्यासाठी एक प्रेरणास्थान होता. तुमच्या निधनाचे वृत्त समजताच खूपच दुख: झाले. तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी कृतज्ञ आहे'. गायक मिका सिंग यांनीही श्रद्धांजली वाहताना लिहिले आहे की. 'पंजाब अभिनेत्री आणि लिजेंड असलेल्या दलजीत कौर या त्यांच्या सुंदर आठवणी ठेवून निघून गेल्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि तिला चिरशांती लाभो.' याच दरम्यान अनेक कलाकार देखील त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहत आहेत.

दलजीत कौर ( Daljeet Kaur ) यांनी १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाज' या चित्रपटातून पहिल्यांदा करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी 'पुट्ट जट्टन दे', 'मामला गद्दल है', 'की बनू दुनिया दा', 'पटोला' आणि 'सईदा जोगन' ,'दाज', 'गिधा', 'पुट्ट जट्टन दे', 'रूप शकीनन दा', 'इशाक निमाना', 'लाजो', 'बटवारा', 'वैरी जट्ट', 'पटोला' आणि 'जग्गा डाकू' या चित्रपटात काम केलं आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT