Latest

Venkatesh Iyer : वेंकटेशची बॅट ‘तळपली’, सुहाना मनमुराद ‘थिरकली’! व्‍हिडिओ व्‍हायरल

मोहन कारंडे

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी ( दि. १६ ) झालेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने केकेआरसाठी तब्बल १५ वर्षांनी शतक झळकावले. 'केकेआर'कडून शतक झळकवणारा वेंकटेश हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या शतकानंतर सुहाना खानने खास सेलिब्रेशन केले. तिने प्रेक्षक गॅलरीमध्ये डान्स देखील केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयपीएल स्‍पर्धेत रविवारी झालेल्‍या सामन्‍यात मुंबई इंडियन्सच्या धारदार गोलंदाजीसमोर केकेआरचे इतर फलंदाज धावांसाठी झगडत होते. तर दुसरीकडे वेंकटेश अय्यर एकाहाती किल्‍ला लढवत होता. त्‍याने संघाच्‍या डावाला आकार दिला. वेंकटेशने ४९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. वेंकटेश अय्यर आयपीएल २०२३ च्या हंगामात शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू हॅरी ब्रूकने यंदाच्‍या मोसमातील पहिले शतक झळकावले होते. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सकडून शतक झळकावणारा वेंकटेश दुसरा खेळाडू ठरला आहे.

सुहाना खानची वेंकटेशच्‍या खेळीला भरभरुन दाद

अय्यरने आपल्या खेळीत ९ षटकार आणि ५ चौकार मारले. आयपीएल २०२३ च्या हंगामात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. हा सामना पाहण्यासाठी अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान उपस्‍थित होती. वेंकटेशच्या शतकानंतर तिने एकच जल्‍लोष केला. अय्‍यरचे शतक पूर्ण झाल्‍यावर तिने नाचत आणि टाळ्या वाजवत आपला आनंद साजरा केला. सुहानाचा हा व्‍हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल होत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT