पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॅलेंटाईन डे अगदी जवळ आला आहे. या विशेष दिनानिमित्त तुमचा लूक खास करण्यासाठी तुम्ही स्टायलिश मेकअप अगदी सहजपणे करू शकता. बहुतेकदा आपल्या सर्वांना या दिवशी आपल्या जोडीदारासोबत डेट किंवा पार्टीला जायला आवडते. यासाठी, आपल्याला बहुतेक वेळा वेस्टर्न किंवा साडी नेसणे आवडते, परंतु लूक पूर्ण करण्यासाठी, आपण सुंदर दिसण्यासाठी योग्य मेकअप (Valentine Day Makeup) निवडणे खूप महत्वाचे आहे.
मेकअप करण्यासाठी, तुमची त्वचा कोणत्या प्रकाराची आहे आणि पोशाख कसा असायला हवा, हे समजून घेणे खूप महतत्वाचं आहे. जेणेकरून तुमचा संपूर्ण लुक पूर्ण दिसू लागेल. बऱ्याच वेळा आपण आपल्या लूकनुसार योग्य मेकअप निवडू शकत नाही. काही स्टायलिश आणि अतिशय सोपे मेकअप लूक तुम्ही या व्हॅलेंटाइन डेटसाठी वापरून पाहू शकता. तुम्ही काही टिप्स फॉलो करून सुंदर व्हॅलेंटाईन डे साजरा करा. (Valentine Day Makeup)
आजकल पेस्टल कलर सर्वांचे आवडते आहे. याप्रकारच्या मेकअप लूकमध्ये तुम्ही एकाच कलरच्या आयशॅडोने मेकअप करा आणि स्टायलिश टच देण्यासाठी इनर कार्नरवर नार्मल हायलायटरसोबत आपल्या आऊटफिटच्या कलर कॉम्बिनेशनच्या हिशोबाने सूट होणारा पेस्टल मॅट कलर मिक्स करा. असे केल्याने तुमचे डोळ्यांचे इनर कॉर्नर खूप सुंदर हायलाईट झालेले दिसतील.
आजकाल अरबी स्टाईल आय लूक खूप ट्रेंडमध्ये आहे.सर्व काही परफेक्ट आयलायनर शेपवर अवलंबून आहे. कारण यामद्ये इनर कॉर्नरच्या आतमद्येही विंग बनवलं जातं. आणि आऊटर कॉर्नरलाही तुम्हाला असे विंग्ज बनवायचे असतील तर तुम्ही सेलो टेपची मदत घेऊ शकता. तुम्ही जर बिगनर असला तर पेन आयलायनर देखील वापरू शकता.
दुसरीकडे, जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी गाऊन स्टाईल करत असाल आणि तुम्ही संध्याकाळी डेटला जात असाल तर ग्लिटर ग्लॅम लूक करू शकता. अशा लुकसाठी बेस मेकअपला ड्यू लूक द्या. तसेच, आपण ब्लश आणि हायलाइटरसाठी लिक्वीड किंवा क्रीम प्रोडक्ट निवडू शकता. याशिवाय, तुम्ही ओठांसाठी ग्लॉस देखील वापरू शकता.