Latest

Vadgaon market committee : वडगाव बाजार समिती निवडणूक; 6 गटांचे संयुक्‍त पॅनेल

backup backup

वारणानगर ः पुढारी वृत्तसेवा : Vadgaon market committee : वडगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोरे, आवाडे, महाडिक, यड्रावकर, शेट्टी व हाळवणकर या सहा राजकीय गटांच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्‍चित केली आहे. या गटांच्या संयुक्‍त पॅनेलची शनिवारी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ.विनय कोरे यांनी बैठकीनंतर दिली.

वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्‍ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक वारणा दूध संघाच्या प्रशिक्षण केंद्रात झाली.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीविरोधात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, आ. कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मोट बांधली आहे.

दरम्यान, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आ. कोरे यांच्याशी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली.

यड्रावकर गटाला एक जागा देण्याचे यापूर्वी निश्‍चित झाले होते.

मात्र, दोन जागांसाठी यड्रावकरांनी तर शेट्टी यांनी एका जागेसाठी आग्रह धरला आहे. (Vadgaon market committee)

वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जि.प.सदस्य अशोकराव माने, शहाजी पाटील, हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, हातकणंगले तालुका खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT