Latest

उत्तराखंड : हरिश रावतांचा परभव करणारे मोहन सिंह बिस्ट कोण आहेत? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मोहन सिंह बिस्ट यांनी मोठा विजय मिळविला आहे. बिस्ट यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचा १४ हजार मतांनी पराभव केला. काॅंग्रेसने हरिश रावत यांना रामनगर मतदार संघातून हटवून लालकुआं मतदार संघातून मैदानात उतरविले होते. त्यामुळे लालकुआं हा मतदारसंघ हाॅट सीट झाला होता.

लालकुआं मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार नवीन दुम्का यांचे तिकिट कापून नव्या चेहऱ्याला म्हणजेच मोहन सिंह बिस्ट यांना देण्यात आले होते. बिस्ट हे हल्दूचौड येथील रहिवासी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून हरिपूर बच्ची जिल्हा परिषेदतून निवडणूक जिंकली होती. ही निवडणूक बिस्ट यांनी स्वतःचा भाऊ आणि भाजपाचे उमेदवार इंदर सिंह बिस्ट यांच्यावर विरोधात लढली होती.

२०१९ मध्ये भाजपानेच मोहन सिंह बिस्ट यांच्या जागी त्यांचे भाऊ इंदर सिंह बिस्ट यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत उभे केलेले होते. त्यावर मोहन सिंह बिस्ट यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरत विजय खेचून आणला होता. तेव्हा भाजपाने मोहन सिंह बिस्ट यांच्यावर पार्टीच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत कारवाई केलेली होती. त्यांना ६ वर्षांसाठी भाजपामधून काढलेले होते.

मोहन सिंह बिस्ट यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात नैनीतालच्या डीएसबी महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकीत विजय मिळवला होता. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकीय जीवनाला सुरूवात केली होती. मोहन सिंह बिस्ट त्यानंतर उत्तराखंड को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशनचे संचालक होते. २०१७ च्या निवडणुकीत हरिश रावत हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण, तिथे त्यांचा सपाटून पराभव झालेला होता. मात्र, २०१४ मध्ये धारचुला उपनिवडणुकीत हरिश रावत यांचा विजय झाला होता.

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT