Latest

Hindu Mahapanchayat Uttarakhand : पुरोलातील हिंदू महापंचायत रद्द; राज्यात शांतता राखा – उच्च न्यायालयाचे आदेश

मोहसीन मुल्ला

डेहराडून, पुढारी ऑनलाईन डेस्क : वादग्रस्त ठरलेली पुरोला येथील हिंदू महापंचायत रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उत्तराखंड उच्च न्यायालयात दिली आहे. ही महापंचायत आज (गुरुवार) होणार होती. या महापंचायत विरोधात जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली होती. या महापंचायतमुळे राज्यात धार्मिक तणाव निर्माण होईल, असा दावा जनहितार्थ याचिकेतून करण्यात आला होता. Association for Protection of Civil Rights या संस्थेने ही याचिका दाखल केली होती. ()

मुख्य न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती राकेश थालपलियाल म्हणाले, "या पावलांचे आम्ही स्वागत करतो. तरीही तुम्ही शांतता आबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत." या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारने काय पावले उचललीत, याचा अहवाल तीन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भातील बातमी बार अँड बेंच या वेबसाईटने दिली आहे.

Hindu Mahapanchayat Uttarakhand : मुस्लिमांना धमकीचे फलक

मुस्लिम समाजाला पुरोला येथून दुकाने खाली करण्यासाठी धमकावणारे फलक लावण्यात आले होते, त्यावरून मोठा वाद झाला होता. याचिकर्त्यांच्या वकील शाहरूख आलम म्हणाल्या, "अशा प्रकारच्या फलकांतून जो संदेश दिला जात होता, तो विविध रॅली, सोशल मीडिया आणि सुदर्शन सारख्या टीव्ही चॅनलवरही दिसू लागला. जिल्हा प्रशासन काहाही कारवाई करत नव्हते, हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, इंडियन पिनल कोड आणि यूएपीए सारख्या कायद्यांचे थेट उल्लंघन करणारे होते. शिवाय सामजिक ऐक्यालाही तडा देणारे आहे."

आलम म्हणाल्या की पुढील आठवड्यात मुस्लिम महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांतून हिंसाराचाराला प्रोत्साहन मिळेल. आलम यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी निर्देश दिले जावेत, अशीही मागणी केली.

Hindu Mahapanchayat Uttarakhand : राज्यात शांततेला सर्वोच्च प्राधान्य

उच्च न्यायालयाने राज्यात शांतता नांदली पाहिजे, आणि लोकांचे जीव आणि मालमत्ता यांचे रक्षण झाले पाहिजे, याची खबरदारी घेणे ही राज्याची सर्वांत मोठी जबाबदारी आहे, असे म्हटले आहे. तसेच घटनात्मक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी राज्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या कार्यक्रमांशी संबंधित सर्वच घटकांना सोशल मीडिया वरील चर्चाआणि टीव्हीवरील कार्यक्रमांत सहभागी होऊ नये, असे म्हटले आहे. Hindu Mahapanchayat Uttarakhand

ही याचिक सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका सर्वप्रथम उच्च न्यायालयात दाखल करावी, अशी सूचना केली होती.

एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण दोघा युवकांनी केले होते. यातील एक तरुण हिंदू तर एक मुसलमान होता. त्यातून या वादाला सुरुवात झाली होती. पोलिसांनी या दोन्ही तरुणांना अटक केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT