Latest

योगी आदित्यनाथ यांनी घेतली राष्ट्रपती कोविंद यांची भेट; सरकार स्थापनेच्या अनुषंगाने भाजप नेत्यांच्याही भेटीगाठी

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे कार्यवाहक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तसेच भाजपच्या विविध नेत्यांची भेट घेतली. येत्या २० किंवा २१ तारखेला योगी आदित्यनाथ लखनौ येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आदित्यनाथ यांच्यासोबत ५७ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आले. यातील २२ ते २४ जणांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद दिले जाऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर योगी आदित्यनाथ रविवारी (दि.१३) रोजी दिल्ली दौऱ्यावर आले होते. या दिवशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आदित्यनाथ यांनी सोमवारी (दि.१४) रोजी सकाळी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात जावून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली.

दिवसभरात त्यांनी धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर यांच्यासह विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा देखील केली.
योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग तसेच संघटन मंत्री सुनील बन्सल हेही दिल्लीत पोहोचले असून भावी सरकारच्या रचनेवर त्यानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.

स्वतंत्रदेव सिंग यावेळी उपमुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आहेत. मावळत्या सरकारमधील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे त्यांची कशी व्यवस्था करायची, यावरही पक्षात खलबते सुरु आहेत.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT