Latest

U.T. Khader: कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी यु. टी. कादर

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा सभापतीपदी कर्नाटक विधानसभा (सौंध) अध्यक्षपदी यु.टी. कादर (U,T. Khader)  यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आज (दि.२४) निवडणूक झाली. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराची विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. कादर हे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिले मुस्लिम नेते आहेत.

मंगळुरु विधानसभा मतदारसंघातील आमदार कादर काँग्रेसकडून पाच वेळा आमदार म्हणून निवड आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान व इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT