Latest

US Shooting : अमेरिकेतील लेविस्टन शहरात अंदाधुंद गोळीबार; २२ ठार, ६० जखमी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील मेन राज्यातील लेविस्टन शहरात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात २२ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक लोक जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर संशयित हल्लेखोर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. रायफलसह संशयित हल्लेखोराची दोन छायाचित्रे फेसबुक पोस्टमध्ये शेअर करण्यात आली असून संशयिताची ओळख पटवण्यासाठी जनतेच्या मदतीचे आवाहन करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

लुईस्टन हा एंड्रोस्कोगिन काउंटीचा भाग असून मेनच्या सर्वात मोठ्या शहर पोर्टलँडच्या उत्तरेस सुमारे ५६किमी अंतरावर आहे. बुधवारी रात्री उशिरा युनायटेड स्टेट्समधील लेविस्टन, मेन येथे झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेत सुमारे २२ लोक ठार झाले, तर जवळपास ६० हून अधिक जखमी झाले. अँड्रॉस्कोगिन काउंटी शेरीफच्या कार्यालयाने गोळीबार करणाऱ्या संशयिताची दोन छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली असून तो फरार असल्याचे सांगितले, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. लेविहस्टन येथील मेडिकल सेंटरने एका निवेदनात म्हटले आहे की, गोळीबाराच्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT