Latest

US Presidential Election 2024 : अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी पुन्‍हा ट्रम्‍प- बायडेन आमने-सामने

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत पुन्‍हा एकदा ज्‍यो बायडेन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असाच सामना रंगणार आहे. आज (13मार्च ) सकाळी ट्रम्‍प यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळाली. तर बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या निवडणुकीत एकदिवस आधीच  (१२ मार्चला) विजय मिळवला होता. त्‍यामुळे आता मागील निवडणुकीप्रमाणेच हे दोन नेते राष्‍ट्राध्‍यक्ष पदाच्‍या निवडणुकीत पुन्‍हा एकदा आमने-सामने येणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍याचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. ( US Presidential Election 2024 )

ज्‍यो बायडेन हे ८१ वर्षांचे आहेत. ते अमेरिकेच्‍या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष आहेत. तर ७७ वर्षीय ट्रम्‍प हे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आहेत. २०१२ नंतर अमेरिकेमध्‍ये आजी-माजी राष्‍ट्रांध्‍यक्षांमध्‍ये सामना रंगणार आहे. आता नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये होणार्‍या निवडणुकीकडे अवघ्‍या जगाचे लक्ष असणार आहे. ( US Presidential Election 2024 )

बुधवारी जॉर्जिया, मिसिसिपी आणि वॉशिंग्टनमधील अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकांमध्ये मतदारांनी मतदान केले, याआधी मंगळवारी डेमोक्रॅट पक्षांच्या प्राथमिक निवडणुकीसाठी मतदान झाले. CNN च्या रिपोर्टनुसार, यंदाच्‍या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प हे ९१ आरोपांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्‍या राजधानीत झालेल्‍या हिंसाचारात हात असल्‍याचा त्याच्यावर आरोप आहे. 2016 च्या निवडणुकीपूर्वी त्याने एका पॉर्न फिल्म स्टारला पैसेही दिले होते. ही गोष्ट त्याने लपवून ठेवली होती, असाही आरोप त्‍यांवर आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT