Latest

Donald Trump : ट्रम्प स्वत:च ठरले स्वत:विरुद्ध पुरावा! दोन महिलांची जबरदस्ती चुंबनेही भोवली; अपिलात जाणार

अमृता चौगुले

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : ई जीन कॅरोल यांचे लैंगिक शोषण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1996 मध्ये केले होते. घटनेचे वैद्यकीय वा तत्सम पुरावे ट्रम्प यांच्या विरोधात चाललेल्या खटल्यात सुनावणीला आले नाहीत. याउपर ज्युरींनी कॅरोल यांची तक्रार ग्राह्य व खरी मानली तसेच ट्रम्प यांना भरपाई द्यावी लागेल, असा निकाल दिला. या खटल्यात अन्य महिलांच्या साक्षी, कॅरोल यांच्या मित्रांच्या साक्षी तसेच ट्रम्प यांचा एकुणातील अ‍ॅटिट्यूड त्यांच्याविरुद्धचे (ट्रम्प) सबळ पुरावे ठरले. (Donald Trump)

व्हाया साक्षही ठरली ग्राह्य (Donald Trump)

कॅरोल हिच्या 2 मित्रांनी त्यांना कॅरोलने ट्रम्प यांनी केलेल्या शोषणाबद्दल सांगितले होते. मात्र, ट्रम्प नुकसान पोहोचवतील म्हणून कुठे बोलू नका, असेही विनविले होते, अशी साक्ष ज्युरींसमोर दिली.

या दोन साक्षी, हा एक पुरावा

1 ट्रम्प यांनी 2005 मध्ये माझ्या ओठांचे जबरदस्तीने चुंबन घेतले होते, असे पीपल मासिकाची वार्ताहर नताशा स्टॉयनोफ हिने कोर्टाला सांगितले.

2 ट्रम्प यांनी 1979 मध्ये माझे जबरदस्ती चुंबन घेतले होते, अशी आणखी एक साक्ष जेसिका लीडस् या दुसर्‍या एका महिलेने दिली.

3 ट्रम्प यांचे 2005 मधील एक रेकॉर्डिंगही सुनावणीत आले. परवानगीशिवाय महिलांचे चुंबन घेणे आणि त्यांना आलिंगन देणे कसे मजेदार असते, याबद्दल स्वत: ट्रम्प या टेपमध्ये बोलत आहेत. (Donald Trump)

हेही जाणून घ्या…

  • कुठलाही धोका नको म्हणून सर्व 9 ज्युरी सदस्यांची नावेही गोपनीय ठेवण्यात आली आहेत.
  • ट्रम्प हे सुनावणीतही सहभागी झाले नाहीत आणि निकालावेळीही ते हजर नव्हते.

पुढे काय ?

  • ही नागरी बाब आहे. खटलाही दिवाणी स्वरूपाचा होता. त्यामुळे ट्रम्प यांच्यासमोर तुरुंगात जाण्याचा धोका नाही.
  • अमेरिकन राष्ट्रध्यक्ष पदाची आगामी निवडणूक लढविण्यास ट्रम्प उत्सुक आहेत. प्रतिमेच्या द़ृष्टीने या निकालाचा फटका त्यांना बसू शकतो.
  • ट्रम्प या निकालाविरोधात अपिलात जातील.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT