Latest

Urvashi In Kantara 2: ‘कांतारा २’मध्ये उर्वशी! पंत नाही तर शेट्टी ठिक…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्वशी रौतेलाच्या फॅन्ससाठी मोठी खुशखबर आहे. ही अभिनेत्री लवकरच ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा २' मध्ये दिसणार आहे. (Urvashi In Kantara 2) या वृत्ताची माहिती स्वत: उर्वशीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिलीय. तिने 'कांतारा'चे दिग्दर्शक ऋषभ शेट्टीसोबत फोटो शेअर करून 'कांतारा २ लोडिंग' असं लिहिलं आहे. (Urvashi In Kantara 2)

ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा'च्या अफाट यशानंतर फॅन्स या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत येत आहेत. 'कांतारा २' ची जेव्हादेखील कोणतीही नवी अपडेट जाणून घेण्यास उत्सुक असतात. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याविषयी एक घोषणा केली आहे की 'कंतारा'चा प्रीक्वल येणार आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री 'कांतारा २' मध्ये दिसणार आहे. स्वत : उर्वशीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून दिलीय.

उर्वशीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर कातांराच्या दिग्दर्शकाचा फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'कांतारा २ @rishabhshettyofficial लोडिंग #RS'. या फोटोसोबत तिने नमस्कार इमोजीदेखील शेअर केला आहे.

पंत नाही तर शेट्टी ठिक

उर्वशी रौतेलाच्या या पोस्टनंतर अनेकांनी कनमेंट करण्यास सुरुवात केलीय. काहींनी तिला ट्रोल करणे सुरु केलं आहे. एका युजरने फोटोवर कॉमेंट करून लिहिलंय-'पंत नाही तर शेट्टी ठिक, बास ऋषभ असायला हवा'.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT