Latest

UPI Transaction : ऑगस्टमध्ये रेकॉर्डतोड UPI व्यवहार, १० अब्जांचा आकडा पार

backup backup

नवी दिल्ली, ०१ सप्टेंबर, पुढारी वृत्तसेवा – UPI Transaction : गेल्या महिन्यात ऑगस्ट २०२३ मध्ये UPI व्यवहारात एक नवीन विक्रम नोंदवला गेला. ऑगस्टमध्ये एकूण १०.२४ अब्ज यूपीआय व्यवहार झाले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI-एनपीसीआय) ने ही माहिती दिली. यूपीआयचा वापर मोबाईल फोनच्या माध्यमातून पैशाच्या तत्काळ व्यवहारासाठी केला जातो. एका अंदाजानुसार, भारतात आता ५७ टक्के व्यवहार यूपीआयच्या माध्यमातूनच केले जातात.

UPI Transaction : १५,१८,४५६ कोटी रुपयांचा झाला UPI व्यवहार

एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टच्या महिन्यात UPI व्यवहाराचा आकडा १०.२४ अब्ज झाला आहे. या काळात सुमारे १५,१८,४५६.४ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. तर, जुलैमध्ये यूपीआय मधून ९.९६ अब्ज व्यवहार झाले होते. तर जूनमध्ये ९.३३ अब्ज यूपीआय व्यवहार झाले. गेल्या दोन वर्षांत यूपीआयचे प्रचलन वेगाने वाढला आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून व्यवहाराचा आकडा केवळ साडेतीन अब्ज होता जो दोन वर्षांत जवळपास तीन पट वाढला आहे. कोरोना नंतरपासून यूपीआय व्यवहारात सातत्याने वाढ होत आहे.

क्यूआरच्या आगमनाने UPI व्यवहारात आणखी वाढ

क्यूआरच्या आगमनाने UPI व्यवहारात आणखी जास्त वेगाने वाढ झाली आहे. एका अहवालानुसार यूपीआयचे ३३० लाखांहून अधिक युनिक वापरकर्ते आहेत आणि सुमारे ७० लाख दुकानदारांनी ३५६ लाख क्यूआर कोडला लावले आहे. याव्यतिरिक्त नवीन-नवीन पेमेंट अॅपमुळे त्याचा व्यवहार वाढला आहे.

UPI Transaction : भारताच्या UPI चा डंका देशातच नाही तर विदेशातही

भारताच्या UPI चा डंका देशातच नाही तर विदेशातही वाजत आहे. अनेक देश भारताच्या यूपीआय पेमेंट मेथडला स्वीकारू इच्छितात. जपानसह ३५ पेक्षा जास्त देश आता भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाला स्वीकारू इच्छितात. आयएमएफनेही भारताच्या डिजिटल पेमेंट मोड यूपीआयची तारीफ केली होती.

उत्सवांच्या काळात आणखी वाढेल आकडा

आजच्या काळात लोकांना पेमेंट करण्यासाठी यूपीआय सर्वात सोपा मार्ग वाटतो. पानाच्या दुकानातून ते मोठ्या-मोठ्या दुकानांमध्ये पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर करतात. तर, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सणांच्या सीझनमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा केली जात आहे. कारण या दोन महिन्यांत लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. रोख रकमेच्या तुलनेत लोक जास्त यूपीआय व्यवहार करतात.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT