Latest

UPI Credit Card : यूपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि काय आहेत त्याचे फायदे?

Arun Patil

पुढारी अर्थभान : UPI Credit Card : क्रेडिट कार्डमुळे मध्यमवर्गीय ते श्रीमंत मंडळींना खरेदी, प्रवास आरक्षण आदी गोष्टींवर खर्च करणे सोयीचे झाले आहे. क्रेडिट कार्डची वाढती लोकप्रियता पाहता ग्राहकांना अधिकाधिक सुविधा दिल्या जात आहेत. यातच 'यूपीआय'युक्त क्रेडिट कार्डचा उल्लेख करावा लागेल.

'यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस क्रेडिट कार्ड'हे डिजिटल व्यवहारात क्रांतिकारी बदल म्हणून समोर आले आहे. क्रेडिट कार्ड सुविधांसह यूपीआय ट्रान्झेक्शनची सुविधादेखील देता येते. हायब्रिड पेमेंट सिस्टिम सोयीची, सुलभतेची, सुरक्षित मानली जात असून त्याच्या कॉम्प्रेन्सिव्ह मान्यतेमुळे यूपीआय क्रेडिट कार्डची लोकप्रियता वाढली आहे.

UPI Credit Card : यूपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

यूपीआय क्रेडिट कार्ड हे एक युनिक पेमेंट सोल्यूशन असून ते क्रेडिट कार्डच्या बेनिफिट्सला जोडते. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यूजरला मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करणे आणि खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्याची परवानगी देते. यूपीआयच्या माध्यमातून होणारा व्यवहार हा अधिक सुविधाजनक आहे. कोणताही यूजर हा बँक डिटेल्स न देता 24/7 व्यवहार करू शकतो. दुसरीकडे, पारंपरिक क्रेडिट कार्ड हे यूजरला क्रेडिटची एक चेन उपलब्ध करून देते आणि या साखळीच्या माध्यमातून खरेदी करणे, पेमेंट करणे यासारख्या सुविधा देते. प्रसंगी कर्ज देण्याचीदेखील सुविधा मिळते. क्रेडिट कार्डमुळे ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट्स, कॅशबॅक आणि व्याजमुक्त कालावधी मिळणे यासारखे अनेक प्रकारचे बेनिफिट्स मिळतात. त्यातून अनेक लोकांसाठी हा आवडीचा पेमेंट पर्याय ठरत आहे.

UPI Credit Card :काय आहेत फायदे ?

रियल टाइम व्यवहार : यूपीआय क्रेडिट कार्ड हे कोणत्याही अडचणींशिवाय वेगवान व्यवहार करत समोरच्या पार्टीला तत्काळ पेमेंट करते.

अ‍ॅडव्हान्स्ड सिक्युरिटी : टू फॅक्टर व्हेरिफिकेशन आणि अतिरिक्त सुरक्षेससह यूपीआय क्रेडिट कार्ड हा गैरप्रकाराविरुद्ध अधिक सुरक्षा प्रदान करते. आजकाल कार्डधारकांना फसविण्याचे प्रकार घडत असताना व्हेरिफिकेशनमुळे ग्राहक सुरक्षितपणे व्यवहार करू शकतो.
सिंगल पेमेंट इंटरफेस : यूजर हा आपल्या पेमेंट प्रक्रियेला सुव्यवस्थित करण्यासाठी एक इंटिग्रेटेड अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यूपीआय क्रेडिट कार्डवरील व्यवहार मॅनेज करू शकतात.

कॅशबॅक आणि रिवॉर्ड : पारंपरिक क्रेडिट कार्डप्रमाणेच यूपीआय क्रेडिट कार्ड हे ग्राहकांना रिवॉर्ड आणि कॅशबॅक ऑफरसह मिळतात. त्यामुळे यूजरसाठी या कार्डवरचे व्यवहार अधिक आकर्षक होतात.

फायनान्शिअल फ्लेक्झिबिलीटी : यूपीआय क्रेडिट कार्ड हे यूजरसाठी यूपीआय किंवा क्रेडिट कार्ड असे दोन्ही मार्गाने व्यवहार वापरण्याची मुभा राहते. म्हणजे प्रत्येक व्यवहार यूपीआयनेच करावा, असे बंधनकारक नाही. या सुविधेमुळे ग्राहकाला खर्चाचे आकलन करणे आणि त्यानुसार कार्डचा वापर करण्याची सुविधा मिळते.

सुविधा देणार्‍या बँका

भारतात अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना यूपीआय क्रेडिट कार्डची सुविधा दिली आहे. ही सुविधा देणार्‍या बँकांचा पुढीलप्रमाणे समावेश करता येईल.

एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, यस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंड्सइंड बँक, पेटीएम पेमेंट्स बँक (यूपीआय पेटीएम पोस्टपेड), यूपीआय क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करणार्‍या बँकांची यादी मोठी राहू शकते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT