पुढारी ऑनलाईन डेस्क : (Upcoming Movies) चित्रपटप्रेमींना फेब्रुवारी महिन्यात मेजवानी मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. यामध्ये आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीपासून ते राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या 'बधाई दो'पर्यंत यांचा समावेश आहे. चला तर मग, फेब्रुवारी महिन्यात चित्रपटगृहात कधी आणि कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आहे ते जाणून घेऊया.
प्रदर्शित तारीख: ११ फेब्रुवारी २०२२
'बधाई दो' हा सुपरहिट चित्रपट 'बधाई हो'चा सिक्वेल आहे. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. (Upcoming Movies)
प्रदर्शित तारीख : २५ फेब्रुवारी २०२२
अनेकवेळा पुढे ढकलल्यानंतर आता हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक बायोपिक आहे आणि आलिया भट्ट मॅडम गंगूची भूमिका साकारत आहे. पत्रकार हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.
प्रदर्शित तारीख: ४ फेब्रुवारी २०२२
हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. मिताली राज हिच्या वाढदिवसाला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. मितालीने दोन विश्वचषकांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. ती गेली २२ वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे आणि १०,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. (Upcoming Movies)
प्रदर्शित तारीख – ११ फेब्रुवारी २०२२
दिव्येंदू आणि अनुप्रिया गोएंका यांचा मेरे देश की धरती हा चित्रपट सामाजिक प्रश्नावर अआधारीत आहे.
प्रदर्शित तारीख – ११ फेब्रुवारी
तेलुगू स्टार रवी तेजा आगामी 'खिलाडी' चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
प्रदर्शित तारीख – २५ फेब्रुवारी
दुल्कर सलमान, अदिती राव हैदरी आणि काजल अग्रवाल यांची मुख्य भूमिका असलेला तमिळ चित्रपट 'हे सिनामिका' २५ फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
प्रदर्शित तारीख – २५ फेब्रुवारी
पवन कल्याण आगामी तेलुगू चित्रपट 'भीमला नायक'मध्ये राणा डग्गुबतीच्या सहकलाकाराची भूमिका साकारत आहे. हा मल्याळम चित्रपट अय्यप्पनम कोशियुमचा अधिकृत रिमेक आहे.
हेही वाचलं का?