Latest

Marathi Movie : एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा “तेरवं” येतोय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही शतकांमध्ये समाजात बदल घडले असले, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही फारसा पुढारलेला नाही. (Marathi Movie ) त्यामुळे एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा "तेरवं" हा चित्रपट जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला मोठ्या पडद्यावर येत आहे. हरिष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संदीप पाठकसह अनेक कसलेले कलाकार दिसणार आहेत. (Marathi Movie )

संबंधित बातम्या – 

तेरवं या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. नरेंद्र जिचकार यांच्या अंजनीकृपा प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे तेरवं चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नरेंद्र राहुरीकर सहनिर्माता आहेत. श्याम पेठकर यांनी तेरवं चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर सुरेश देशमाने यांनी छायांकन, वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे, शर्वरी पेठकर, प्रवीण इंगळे, संहिता इथापे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत.

तेरवं हा चित्रपट जनाबाई या स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगतो . कौटुंबिक ते सामाजिक आव्हानं येऊनही खंबीरपणे त्याला कस सामोरं जात वेगळं काम निर्माण करणाऱ्या जनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन या चित्रपटात घडवण्यात आलं आहे.

SCROLL FOR NEXT