'शिवा' आणि 'पारू' च्या स्वागतासाठी अश्विनी भावे- मृणाल कुलकर्णी सज्ज | पुढारी

'शिवा' आणि 'पारू' च्या स्वागतासाठी अश्विनी भावे- मृणाल कुलकर्णी सज्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर १२ फेब्रुवारीपासून आपल्या प्रेक्षकांसाठी २ नव्या मालिका घेऊन येत आहे. दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. ‘शिवा’ आणि ‘पारू’ च्या स्वागतासाठी मराठी अभिनेत्री अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी सज्ज झाल्या आहेत.

संबंधित बातम्या 

माणुसकीला जपणारी, आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी ‘पारू’ म्हणजे जणू झरझरणारा अवखळ झरा. अशा नटखट, अवखळ पारूची भूमिका साकारणार आहे ‘शरयू सोनावणे’. तर दुसरीकडे अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिनधास्त जगणारी, निडर ‘शिवा’, ही जणू धगधगता पेटता निखारा आणि या निखाऱ्याचं नाव आहे ‘पूर्वा कौशिक. तर अशा या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

दोन नवीन तारका झी मराठीवर आगमन करत असल्याने स्वागत करायला मराठी मनोरंजनसृष्टीतील दोन नावाजलेल्या तारका सरसावल्या आहेत. त्या म्हणजेच मराठी अभिनेत्री ‘अश्विनी भावे’ आणि ‘मृणाल कुलकर्णी’ सज्ज झाल्या आहेत. याच्यासोबत झी मराठीच्या लाडक्या नायिका उमा, अक्षरा, नेत्रा आणि अप्पी याही आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Back to top button