Latest

UP Exit Poll : मुख्यमंत्री होताच योगी आदित्यनाथ यांच्या नावावर नोंदवले जाणार ३ विक्रम!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशची जनता पुढील पाच वर्षांसाठीची सत्ता कोणाच्या हाती सोपवणार? या प्रश्नाचे नेमके उत्तर १० मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे. सध्या यूपीमधील जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एक्झिट पोलचे (UP Exit Poll) आकडे निकालात रुपांतरीत झाले तर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यूपीची कमान सांभाळतील. यासह ते मुख्यमंत्री म्हणून किमान ३ विक्रम त्यांच्या नावावर नोंदवले जातील.

निवडणुकीपूर्वीच सीएम योगी आदित्यनाथ यांनी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. यूपीमध्ये आतापर्यंत एकूण २१ मुख्यमंत्री झाले आहेत, त्यापैकी केवळ तीनच त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले आहेत. योगींच्या आधी, बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी (२००७ ते २०१२) पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. यानंतर अखिलेश यादव यांनी २०१२ ते २०१७ असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. (UP Exit Poll)

योगी १५ वर्षात पहिले आमदार मुख्यमंत्री होणार?

एक्झिट पोलनुसार, भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास योगी आदित्यनाथ १५ वर्षांनंतर यूपीचे मुख्यमंत्री होतील, जे विधानसभेचे सदस्य असतील. २०१७-२२ च्या कार्यकाळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. अखिलेश यादवही विधान परिषदेचे सदस्य म्हणून मुख्यमंत्रीही झाले. (UP Exit Poll)

३७ वर्षांत सत्ता राखणारे पहिले मुख्यमंत्री..

भाजपला बहुमत मिळाल्यास योगी अदित्यनाथ ३७ वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. १९८५ मध्ये राज्यात निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी (एन डी तिवारी) अविभाजित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसचा विजय झाला आणि ते सलग दुसऱ्यांदा या पदावर विराजमान झाले. त्यानंतर कोणत्याही नेत्याला सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची राखता आलेली नाही. योगी आदित्यनाथ यांना विक्रम करण्याची संधी आहे. एनडी तिवारी यांच्यापूर्वी, इतर तीन मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा सत्तेत आले होते. १९५७ मध्ये संपूर्णानंद, १९६२ मध्ये चंद्रभानू गुप्ता आणि १९७४ मध्ये हेमवती नंदन बहुगुणा होते. आता योगी आदित्यनाथ हे यूपीच्या इतिहासात सलग मुख्यमंत्री पदी विराजमान होणारे पाचवे नेते ठरू शकतात. (UP Exit Poll)

सलग दुसरी टर्म सत्ता मिळवणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री…

यूपीने आतापर्यंत भाजपचे चार मुख्यमंत्री पाहिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या आधी कल्याण सिंह, रामप्रकाश गुप्ता आणि विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, आदित्यनाथ यांच्या आधी भाजपचा एकही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा सत्ता राखू शकला नाही. योगी आदित्यनाथ यांना नवा विक्रम करण्याची संधी आहे. (UP Exit Poll)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT