Latest

UP By poll Result : डिंपल यादव ८० हजार मतांनी आघाडीवर; तिन्ही जागांवर सपाची आघाडी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि रामपूर सदर आणि खतौली विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव निर्णायक आघाडीच्या दिशेने आहेत. जसवंत नगरमध्ये डिंपल यादव ८० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

खतौली पोटनिवडणुकीत माजी आमदार विक्रम सिंह सैनी यांच्या पत्नी राजकुमारी सैनी भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी रोलौद आणि सपा आघाडीचे मदन भैया आघाडीवर आहेत. आतापर्यंत त्यांना ७८८८ तर भाजपच्या राजकुमारी सैनी यांना ३८५८ इतकी मते मिळाली आहेत. तर रामपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सपाचे असीम राजा यांना ५७६७ मते तर भाजपचे आकाश सक्सेना यांना २५४३ मते मिळाली आहेत.

निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकांसाठी ५ डिसेंबरला मतदान झाले होते. मैनपुरी लोकसभा मतदारसंघात ५४.०१ टक्के, खतौली विधानसभा मतदारसंघात ५६.४६ टक्के आणि रामपूर सदर विधानसभा मतदारसंघात ३३.९४ टक्के मतदान झाले होते. समाजवादी पक्षाचे (एसपी) संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेमुळे मैनपुरी लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. दुसरीकडे, सपा आमदार आझम खान आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार विक्रम सिंह सैनी यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिक्षा झाल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे रामपूर सदर आणि खतौली विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT