Latest

Unseasonal Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा; पिकांना फटका

Shambhuraj Pachindre

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी (दि.20) अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. अनेक दिवस वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेत वाढ होत होती यामुळे सर्वाना त्याचा त्रास होत होता. परंतु, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पावसामुळे आंबा-काजू पानांवर याचा परिणाम होणार असून काजू व आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत. (Unseasonal Rain)

गेली दोन दिवस हवामान विभागाकडून अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले होते. शुक्रवारी पावसाने जिल्ह्यातील काही भागात तुरळक हजेरी लावली. आज सकाळपासूनच नांदगावसह , फणसगाव परिसरात चांगलाच पाऊस पडला तर काही भागात तुरळक पाऊसाने हजेरी लावली. (Unseasonal RainUnseasonal Rain)

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. तर काजू व आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. हाताशी आलेल्या पिकावर अवकाळी पावसामुळे संकट ओढावल्याने उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक मंदावली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT