Latest

विद्यार्थ्यांना देशातील ठिकाणांची माहिती देण्यासाठी विद्यापीठे घेणार पर्यटनस्थळे दत्तक

अविनाश सुतार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशभरातील विद्यापीठे उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटन स्थळ दत्तक घ्यावे आणि विद्यार्थ्यांनी संबंधित पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, सहली आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.
आपल्या देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती, वास्तू, वन्यजीवन माहिती होण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने योजना तयार केली आहे.. यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी हे परिपत्रक आणि योजनेचे संकल्पपत्र संकेतस्थळावर अपलोड केले आहे.

विद्यार्थ्यांचे देशाविषयीचे ज्ञान वाढण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने एक पर्यटन स्थळ निवडावे, त्या ठिकाणाविषयी माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, त्या ठिकाणाशी संबंधित उपक्रमांचे वर्षभर आयोजन करावे, अभ्यास सहलीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळी जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव समाजमाध्यमांत प्रसारित करावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

आता पर्यटनालाही चालना…

उच्च शिक्षणात होणारे बदल, नवी धोरणे या संदर्भात यूजीसीकडून सातत्याने विविध मार्गदर्शक सूचना, परिपत्रके प्रसिद्ध करण्यात येत असतात. त्याशिवाय केंद्रीय मंत्रालयांच्या योजनांशी संबंधित उपक्रम राबवण्याबाबत निर्देशही दिले जातात. त्यात आता पर्यटन मंत्रालयाच्या नव्या योजनेची भर पडली आहे. त्यामुळे वर्षभर काय काय करायचे, कोणकोणते उपक्रम राबवायचे, असा प्रश्न महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना यानिमित्ताने पडला आहे.

• शहर, गाव, अभयारण्य किंवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण विद्यापीठाने निश्चित करून दत्तक घ्यायचे आहे.
• पर्यटन स्थळांची यादी.. ळपलीशवळलशश्रळप- वळस या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील पर्यटन स्थळ निश्चित करावे लागणार
• ठिकाण निश्चित झाल्यानंतर या संदर्भात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदी उपक्रम वर्षभर आयोजित करावे लागणार
• ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ, संग्रहालय, अभयारण्य, हस्तकला केंद्र अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची दोन ते तीन दिवसांसाठी अभ्यास सहल आयोजित करावी लागेल.
• राज्यातील पर्यटन अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी लागेल. जेणेकरून संग्रहालयासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ केले जाईल.

हे वचलंत का? 

SCROLL FOR NEXT