Latest

कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी थेट केंद्रीय मंत्र्याचा महापालिका अधिकाऱ्याला फोन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील एका कर्मचार्‍याची बदली रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्र्याने थेट महापालिकेच्या अधिकार्‍यालाच फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विविध पक्षांचे गटनेते, विषय समित्या आदी पदाधिकार्‍यांची कार्यालये बंद करण्यात आली आहेत.

त्यामुळे या कार्यालयांमधील कायम आणि कंत्राटी कर्मचार्‍यांची इतर विभागात बदली करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे पदाधिकार्‍यांच्या कार्यालयात काम करणार्‍या या कर्मचार्‍यांपैकी काहीनीं नियुक्ती केलेल्या ठिकाणी रुजू होण्यास असमर्थता दाखवली होती. तसेच बदल्या तोंड पाहून केल्याचाही आरोप केला होता.

काही कर्मचार्‍यांनी माजी पदाधिकार्‍यांकडे आणि आमदारांकडेही बदली रद्द करण्यासाठी वशिले लावले होते. मात्र, काहीच दाळ शिजत नसल्याने अनेकजण नवीन ठिकाणी रुजू झाले. मात्र, काहींनी रुजू न होण्यावर ठाम रहात बदली रद्द करण्यासाठी थेट केंद्रींय मंत्र्यालाच गळ घातली. त्यानंतर संबंधीत केंद्रीय मंत्र्याने महापालिका अधिकार्‍याला फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT