Latest

JKDFP Banned : काश्मीर इस्लामिक स्टेट करू म्हणणाऱ्या JKDFP पक्षावर बंदी; मोदी सरकारची कारवाई

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशविरोधी कारवाई आणि पाकिस्तानला पुरक भूमिका घेत असल्याने काश्मीरमधील जम्मू काश्मीर डेमॉक्रेटिक फ्रिडम पार्टी (JKDFP) या पक्षावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. UAPA कायदा १९६७मधील तरतुदीनुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे. (JKDFP Banned)

केंद्रीय गृहमंत्रायलाने या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की हा पक्ष १९९८पासून भारत विरोधी कारवायांत गुंतला आहे, आणि या पक्षाचे सदस्य नेहमी फुटीरतावादी आणि दहशवादी विचारांना चालना देतात.

भारताच्या अखंडतेला धोका | JKDFP Banned

"लोकांना भडकवून काश्मीर स्वतंत्र इस्लामिक स्टेट बनवण्याचा या पक्षाचा उद्देश आहे. त्यामुळे हा पक्ष भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धोका आहे," असे मंत्रालयाने म्हटले आहे. या पक्षातील सदस्यांवर UAPA 1967, IPC 1860, Arms Act 1959 आणि Penal Code 1932 नुसार गुन्हे नोंद आहेत. जम्मू आणि काश्मीर डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टीची स्थापना शब्बीर अहमद शाह याने केली होती, तो सध्या तुरुंगात आहे. शहावर मनीलाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे गुन्हे नोंद आहेत.

शाह याने काश्मीर हा वादग्रस्त पक्ष असून भारतीय घटनेच्या चौकटीत या वादावर तोडगा निघू शकणार नाही, असे वक्तव्य केले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT