Latest

अर्ध्या पगारात काम करु, तेही पेन्शनविना! बेरोजगारांचा आज कोल्हापुरात मोर्चा

दिनेश चोरगे

कोल्हापूर : शासकीय कर्मचार्‍यांच्या संपावर पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत असतानाच शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगारांच्या काढण्यात येणार्‍या मोर्चाला 'यायला लागतंय' असा संदेश व्हायरल झाल्याने हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हायरल मेसेजवर कोणाचे नाव अथवा मोबाईल नंबर नसल्यामुळे पोलिस मोर्चाच्या काढणार्‍यांच्या मागावर आहेत.

'जुनी पेन्शन रद्द करा, महाराष्ट्र वाचवा', 'आम्ही तयार आहोत, अर्ध्या पगारावर काम करायला तेही पेन्शनविना….' असा उल्लेख असणारा आणि शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्‍या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींचा मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारा संदेश बुधवारपासून व्हायरल होत आहे. मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता दसरा चौकातून होणार असल्याचेही म्हटले आहे.

बेरोजगारांच्या या भूमिकेची सगळीकडे चर्चा होत आहे. जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. याच दरम्यान बेरोजगार युवक युवतींचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT