Latest

खरा बुलडोझर काय असतो हे दाखवून देऊ : उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाला इशारा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आज येथे काही घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रु गेली असती. यांना आता सत्तेची मस्ती आली आहे. कहींना सत्तेचा माजा आलेला आहे. त्यामुळे त्यांनी शाखा पाडली. परंतु खरा बुलडोझर काय असतो हे दाखवून देऊ. यांची मस्ती निवडणुकीत उतरवून टाकू. आमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर पोलीस बाजूला करून समोर या, आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तर केस उपटून टाकू, आम्ही लढण्यासाठी तयार आहे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिले. Uddhav Thackeray

शाखेपाशी ठेवलेला खोका उचला, अन्यथा फेकून देऊ. आमच्याकडे एकजणही भाड्याने कोण आलेला नाही. आज निश्चय करा, नेभळटांना थारा देणार नाही,असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.  Uddhav Thackeray

मुंब्रा येथे बुलडोझरने पाडलेल्या शिवसेनेच्या शाखेची  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज (दि.११) सायंकाळी ५.३० च्या सुमारास पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. तर यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यामध्ये वाद झाला. आव्हाड यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला.

यावेळी संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, मिलिंद नार्वेकर आदी नेते उपस्थित होते.  शाखेच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT