Latest

Uddhav Thackeray vs Chitra Wagh :’विदूषक, शिल्लक सेना…’ चित्रा वाघ यांचा पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरु असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यातील आरोप-प्रत्यारोप जोरदार सुरु आहे. चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वाचा काय आहे ती पोस्ट चित्रा वाघ यांच्या शब्दात… (Uddhav Thackeray vs Chitra Wagh)

शिल्लक सेना तुमची उर बडवतेय फुकट

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी, आपल्या 'X' खात्यावर एक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल आहे की,

"विदूषकांना विदूषक म्हंटलं की फार येतो राग
कपाळावरची शीर उडते नि अंगाची होते आग
आम्हाला आता शिकवू लागलात तुम्ही नैतिकता
पण खरंच उद्धवजी, दिसता कसे तुम्ही आरशात स्वत: ?
अडीच वर्षांत तुम्ही पाहिले नाही कधी मंत्रालयाचे दार
विरोधकांवर करत राहिलात फक्त फेसबुकवरून वार
का हो जनतेचे दु:ख तुम्ही जाणून नाहीच घेतले कधी..?
कोविड घोटाळ्यात टपलेल्या बोक्यासारखी मलई खाल्ली आधी.
राजकारण सोडून मारत बसता बिनबुडाचे टोमणे
एकच काम तुम्हाला, खाजवून अवधान आणणे.
आता कशाने फुटलाय घाम आणि कानांना बसलीय दडी
जास्त जोरात लागते काय आमचीदेखील शाब्दिक छडी?
शिल्लक सेना तुमची उर बडवतेय फुकट
शहाणपण उमजावे लागते ते मिळत नाही विकत…!"
चित्रा वाघ यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
संबधित बातम्या

Uddhav Thackeray vs Chitra Wagh : काय आहे प्रकरण

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबुज्या असा केला होता. यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत सडकून टीका केली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी एक विदूषकाचे कपडे घातलेल्या व्यक्तीलाही आणलं होतं.
यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, "सर्कसमध्ये विदूषकाचं म्हणजे जोकरचं काम असतं लोकांना हसवणं. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधव हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवण्याचे काम करताहेत. त्यांच्या या कामात आणखी रिॲलिटी यावी यासाठी भाजप महिला मोर्चा तर्फे मी त्यांना विदूषकाचा हा पोशाख पाठवत आहे. हा पोशाख पाहून उद्धव ठाकरेंच्या कायम लक्षात राहावं की, ते आता फक्त करमणुकी पुरतेच उरले आहेत."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT