Latest

Raju Shetty on Uddhav Thackeray |उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवला : राजू शेट्टी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेतून फुटून गेलेल्या गद्दारांचा पराभव करण्यासाठी हातकणंगले लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली होती. परंतु, ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी शब्द फिरवला आणि आपला उमेदवार दिला, असे राजू शेट्टी यांनी आज (दि.७) पुढारी न्यूजशी बोलताना सांगितले. Raju Shetty on Uddhav Thackeray

राज्यात लोकसभेच्या ६ जागा लढविण्यावर ठाम असल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मला मशाल चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी मशाल चिन्हावर लढण्यासाठी एबी फॉर्म घ्यावा लागला असता त्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागला असता. परंतु ही शेतकऱ्यांशी प्रतारणा झाली असती. मी प्रवेश केला तर शेतकरी चळवळ चालवणार कोण ? मी शेतकरी चळवळीला वाऱ्यावर सोडू शकत नाही. मला स्वार्थासाठी राजकारण करायचे नाही. मी करियर म्हणून राजकारण करत नाही, असे त्यांनी स्पष्ट करून वैयक्तिक फायद्यासाठी मी कोणताही निर्णय घेणार नाही, असे ते म्हणाले. Raju Shetty on Uddhav Thackeray

ठाकरे गटाने उमेदवार उभा केला तरी, मला काही फरक पडत नाही, लढणे हे माझा धर्म आहे. मी लढणारा कार्यकर्ता आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर कुणाला कमी लेखाचे नाही आणि घाबरायचेही नाही. मागील निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मी मान्य केला आहे. आता पुन्हा जनता निर्णय घेणार आहे, जनता जे ठरवेल, ते मान्य असेल, असे ते म्हणाले. जो कष्ट करतो, घाम गाळतो, अशा कष्टकरी जनतेच्या जीवावर मी निवडणूक लढवत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT