Latest

Uddhav Thackeray : आमचे वाली तुम्हीच, आम्हाला न्याय द्या; शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंना विनंती

अमृता चौगुले

संगमनेर : तालुक्यातील वडझरी खुर्द आणि तळेगाव भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि आम्हाला आता कोणी वाली राहिले नाही. आमचे पीके सर्व जळून गेले आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून दुबार पेरणीचे संकट आमच्यावर ओढावले आहे. पीक विम्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही. त्यामुळे तुम्हीच आमचे वाली आहात तुम्ही आम्हाला न्याय द्या अशी विनवणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना केली.

राज्याची माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यातील अत्यंत दुष्काळी असणाऱ्या वडझरी खुर्द गावाची निवड झाली. या दोन गावातील नुकसान झालेल्या सोयाबीन आणि बाजरी या पिकाची पाहणी केली. तुम्हाला आपल्या सरकारच्या काळात केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळाला का असे विचारले असता, मिळाला असे शेतकऱ्यांनी सांगितले.

आमच्या पिकाचे नुकसान झाले, मात्र अद्यापही पंचनामे झाले नाही. याबाबत ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे, नुकसान भरपाई तुम्हाला मिळते का हे मला कळवत जा. सध्या टोमॅटोला 70 ते 80 रुपये कॅरेट असा भाव मिळत आहे. त्यामुळे महागडे पाण्याचे टँकर आणायची तरी कसा. आम्हाला बँकेच्या नोटीस यायला लागल्या आहेत. अडीच ते तीन हजार रुपयाला एक टँकर त्यामुळे या दुष्काळात आम्ही पिके जगवायची तरी कशी अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. शिवसेना तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT