Latest

“परिवार तुम्हाला देखील आहे, आम्ही बोललो तर… ”; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'विरोधकांची पाटणा बैठक ही परिवार बचाव बैठक आहे,' अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली होती. त्यांच्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी प्रतुत्तर दिले आहे. "देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराबद्दल आम्ही बोललेलो नाही. आम्ही बोललो तर तुम्हाला तर फक्त शवासन कराव लागेल. त्यामुळे परिवाराबद्दल बोलू नका, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. मुंबई येथे शाखाप्रमुखांच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी १ जुलैच्या मोर्चाबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशात सातत्याने जे सर्व्हे झालेत त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आले आहे. भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव आलं नव्हत. मी नायक की खलनायक हे जनता ठरवेल पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहित आहे. मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा, आम्ही घाबरत नाही पण त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू होता. अशी जेव्हा आणीबाणीची परिस्थिती येते तेव्हा नियमांच्या पलीकडे जाऊन लोकांचे जीव वाचविणे गरजेचे असते ते आम्ही केले. महाराष्ट्रात कोविडच्या काळात प्रेतांची विटंबना झाली नाही. मिळेल तिथे खा ही आमची परंपरा नाही. चौकशी करावयची असेल तर ठाणे, पिंपरी चिंचवड महापालिकेची करा. ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला तो आमची काय चौकशी करणार. तुम्ही आमची चौकशी जरूर करा पण आम्हीसुद्धा तुमची चौकशी करणार. आम्ही सांगतो त्यांच्यावर धाडी टाका. संजय राऊतांनी तक्रारी केलेल्या नेत्यांची तुम्ही चौकशी करणार का? असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT