Latest

कल्याण येथे अमली पदार्थांची विक्री करताना दोन पोलिसांना अटक (Video)

अविनाश सुतार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : गांजा, चरस सारख्या अमली पदार्थांवर बंदी असताना अनेक वेळा या पदार्थांची छुपी वाहतूक करून विक्री केली जाते. हे पदार्थ वाहतूक करताना आढळून आले, तर पोलीस कारवाई करतात. मात्र, स्वतः पोलीसच अमली पदार्थांची विक्री करताना कल्याण येथे आढळून आले आहेत.

या पोलिसांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. महेश वसेकर ( वय 53) आणि रवी विशे (वय 32) असे या दोन पोलिसांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ९१ हजार रुपयांचे ९२१ ग्रॅमचे चरस जप्त करण्यात आले. अमली पदार्थ चरस विक्री करणारे हे दोन्ही पोलीस रेल्वे पोलीस दलात कार्यरत आहेत. या दोघांनाही दुर्गाडी किल्ल्याजवळ रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यानंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT