Latest

Twitter Layoffs Indian Staff : ट्विटरकडून भारतातील कर्मचाऱ्यांची कपात सुरु; ईमेलद्वारे पाठवल्या नोटीशी

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक नोकऱ्या कपातीचा एक भाग म्हणून ट्विटरने भारतातही आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरने आजपासून जगभरातील आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल तसेच सीएफओ आणि इतर काही उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले होते. (Twitter Layoffs Indian Staff)

सीईओ आणि सीएफओ यांना काढून टाकल्यानंतर एकामागून एक टॉप मॅनेजमेंटमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. ट्विटरने शुक्रवारी कंपनीची जागतिक कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची घोषणा केली. ट्विटर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "भारतात कपात सुरू झाली आहे." काही सहकाऱ्यांना ईमेलद्वारे याबाबत माहिती मिळाली आहे. (Twitter Layoffs Indian Staff)

पीटीआयच्या माहितीनुसार, कर्मचारी कपात धोरणामुळे ट्विटरच्या भारतीय कर्मचाऱ्यांचा एक मोठ्या वर्गाला फटका बसला आहे. तत्पूर्वी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने कर्मचाऱ्यांना दिलेल्या अंतर्गत ईमेलमध्ये म्हटले होते की, ट्विटरला चांगल्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नात आम्ही शुक्रवारी पासून आमचे जागतिक कर्मचारी कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जात आहोत. यासंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक ईमेल पाठवण्यात येईल, असे कंपनीने म्हटले होते. (Twitter Layoffs Indian Staff)

ट्विटर इंडियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही (Twitter Layoffs Indian Staff)

कर्मचार्‍यांच्या कपातीवर ट्विटर इंडियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनीअरिंग आणि मार्केटिंगसह अनेक विभागांमध्ये ही कपात झाली आहे. कपातीबाबत मस्कचा यांचा कठोर दृष्टिकोन कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये दिसून येतो. ट्विटरने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, की कंपनी ट्विटर सिस्टम आणि ग्राहकांच्या डेटासाठी तयार केलेली सर्व कार्यालये तात्पुरती बंद करेल. 'तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसला जात असाल तर कृपया घरी परत जा' असं ट्विटरने म्हटलं होतं.

कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने होईल कमी 

मस्क यांच्या मते, ट्विटर अंदाजे 7,500 कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ निम्म्याहून कमी करू शकतो. एप्रिलमध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर मस्कने काही दिवसांनी माघार घेतली. पण नंतर कायदेशीर त्रास टाळण्यासाठी त्यांनी हा करार पूर्ण केला.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT