Latest

Tungnath temple : तुंगनाथ मंदिर ६ तर मूर्ती १० अंशांनी कलले; पुरातत्त्व विभागाची माहिती

अमृता चौगुले

रुद्रप्रयाग; वृत्तसंस्था : उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तुंगनाथ शिवमंदिराची संरचना वर्षांनुवर्षे अगदी हळुवारपणे एका बाजूने कलत आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराची संरचना आजवर 6 अंशांनी, तर मंदिरातील मूर्ती 10 अंशांनी कललेल्या आहेत. (Tungnath temple)

जमिनीचे सरकणे किंवा खचणे हे यामागचे कारण असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुरातत्त्व विभागाने काढला आहे. मंदिर कलण्यामागच्या कारणांचा शोध पुरातत्त्व विभागाकडून घेतला जात आहे. (Tungnath temple)

12 हजार 800 फूट उंचीवरील हे मंदिर जगातील सर्वात उंचावरील शिवमंदिर आहे. पुरातत्त्व विभागाने याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. हे मंदिर स्मारक संरक्षित घोषित करावे, अशी सूचना केंद्राने राज्य सरकारला केली आहे. (Tungnath temple)

पुनर्पायाभरणीसाठीही तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. तपशिलवार अध्ययनानंतर जे करायला हवे ते केले जाईल.
मनोज कुमार सक्सेना,
अधीक्षक, पुरातत्त्व विभाग

SCROLL FOR NEXT