Latest

वाळवा : कामेरीनजीक तिहेरी अपघात; इस्लामपूर पालिकेचा कंत्राटी कर्मचारी ठार

backup backup

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) नजीक टेम्पो, अग्निशमन बंब आणि ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. हा अपघात बुधवारी दुपारी घडला. या अपघातात इस्लामपूर पालिकेचा कंत्राटी कर्मचारी दादासो हिंदुराव राऊत (वय ४५, रा. मरळनाथपूर) हे ठार झाले. अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाने पलायन केले. (Islampur Accident)

इस्लामपूर पालिकेचा अग्निशमन बंब दुरुस्तीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून गॅरेजकडे नेत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने हाअपघात झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इस्लामपूर नगरपालिकेकडील अग्निशमन बंब (एम.एच.-१०/पी-१००४) हा नादुरुस्त झाला होता. पालिकेचा ट्रॅक्टर (एम.एच.१०/९२१३) ने अग्निशमन बंब ओढून दुरुस्तीसाठी नेत होते.

Islampur Accident : नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव

कामेरीनजीक पाठीमागून आलेला टेम्पो (.के.ए.-५२/६१७२) ने अग्निशमन बंबाला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत अग्निशमन बंब ट्रॅक्टरवरून जावून आदळला. धडकेनंतर ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला.

ट्रॅक्टर चालक नामदेव खोत व त्यांच्या शेजारी बसलेले दादासो राऊत हे जखमी झाले. नामदेव यांच्या पायाला मार लागला. नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दादासो राऊत यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राऊत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT