Latest

Jalna Accident : बदनापूर जवळ ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली; २५ प्रवासी जखमी

निलेश पोतदार

जालना ; पुढारी वृत्‍तसेवा छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील म्हात्रेवाडी गावाजवळ पुलावरून खासगी बस कोसळली. Jalna Accident या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. पुण्याहून नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला.

पुणे येथून नागपूरकडे जाणारी एम एच 40 69 69 या क्रमांकाच्या खासगी बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस म्हात्रेवाडी जवळील पुलावरून खाली कोसळली. Jalna Accident हा अपघात (सोमवार) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये मोहम्मद शेफुद्दीन, अमन कुमार, अहमद खान, किरण गणेश भिसे, वर्षा मंटूले, वर्षा नागरवाडे, संभाजी सासणे, पराग शिंगणे यांचा जखमींमध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. Jalna Accident बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. जखमींवर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर प्रवाशांच्या सामानाची चोरी होऊ नये यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्यासह कर्मचारी घटनास्‍थळी बंदोबस्‍त ठेवून होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT